| |

मराठी बोधकथा – Marathi Bodhkatha

 ➖➖ 🌻*उपकार कुणावर करावे🌻 ❓*➖➖

🟣 *बोधकथा*  🟣

मराठी बोधकथा – Marathi Bodhkatha 

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. दोन दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. {Marathi Bodhkatha}.

आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली, आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका.{Marathi Bodhkatha}

पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली.{Marathi Bodhkatha}

एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका गरुडाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्ल विचारले. बकरीने त्याला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व गरुडाच्या लक्षात आले. आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या गरुडाने मनातल्या मनात ठरवले.

एकदा गरुड उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडली. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असता अधिकच खोल जात होती. शेवटी गरुडाने त्यांना अलगद बाहेर काढले. {Marathi Bodhkatha}

उंदराची पिले ओली झालेली व थंडीने कुडकुडत होती. गरुडाने त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ ऊब दिली. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी गरुडाने  उंदराच्या पिलांचा निरोप घेतला आणि भरारी घेण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या त्याला उडता येईना. तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले.

उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता त्या गरुडाचे संपूर्ण पंख कुरतडले होते. फडफडत कसेबसे गरुड तेथून बकरी पर्यंत पोहचले आणि त्याने बकरीला त्याबाबत विचारले.

“तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले. पण दोघांना वेगवेगळे फळ कसे मिळाले?”

बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली,

{ Marathi bodh katha pdf file download }”उपकार कधीही वाघा सारख्या दिलदार व्यक्तित्वावर करावेत, उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत. कारण, स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्था करिता दूसरा पर्याय शोधात असतात. स्वतःचा स्वार्थ साधला कि, ते सच्च्या व प्रमाणिक माणसाला सुद्धा विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. मात्र दिलदार स्वभावाचे लोक निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्याऱ्याला लक्षात ठेवतात.”🙏🙏🌹🌹 Read More Bodhkatha Marathi >> 👈👈

>>>>>>

 1. Marathi Bodhkatha
 2. Marathi Bodh Katha
 3. Marathi Bodh katha Tatparya
 4. Marathi Bodh Katha Small
 5. Marathi Bodh katha In Writing
 6. मराठी बोधकथा लहान
 7. मराठी बोधकथा तात्पर्य
 8. मराठी बोधकथा pdf
 9. मराठी बोधकथा pdf download
 10. मराठी बोधकथा लहान मुलांसाठी
 11. Marathi bodh katha small
 12. Marathi bodh katha in writting
 13. Marathi bodh katha pdf file download
 14. Marathi Bodhkatha pdf
 15. Marathi Bodhkatha lyrics
 16. Marathi Bodhkatha Birbal
 17. Marathi bodh Katha books
 18. Marathi Bodhkatha for whatsapp
 19. Marathi bodh katha video
 20. Marathi bodh katha video download
 21. Marathi Bodhkatha sangrah
 22. सकारात्मक बोधकथा
 23. पंचतंत्र मराठी गोष्टी pdf
 24. मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf
 25. हिंदी बोधकथा लहान
 26. सत्य बोधकथा 
 27. नवीन बोधकथा
 28. संतांच्या बोधकथा
 29. विधर्थ्यासाठी प्रेरणादायी कथा
>>>> 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *