मराठी कविता | fyba marathi kavita | Marathi Poem

 मराठी कविता | fyba marathi kavita |  Marathi Poem

Marathi kavita On Life : तर मित्रांनो आजचा लेख आहे fyba marathi kavita तुम्ही मराठी कविता तर ऐकलेल्या असतीलच जेव्हा शिक्षक वर्गात कविता सांगत असतात तेव्हा आपल्याला कविता आणखी आवडायला लागतात कारण मराठी कवितेत खूप सारा अर्थ दडलेला असतो.

कारण कविता ही काही शब्दाची 10 ते 20 ओळीपर्यंत असू शकते पण यामागील दडलेला सारांश खूप मोठा असतो एका ओळींचा अर्थ खूप मोठा होतो तुम्ही कधी कवितेचा सारांश शोधला आहे का?

fyba marathi kavita,मराठी कविता,marathi poem, marathi poetry,
मराठी कविता

नक्कीच वर्गात तुम्हाला कवितेचे स्पष्टीकरण दिले जाते, पण तुम्ही सुद्धा स्वतःहून कवितेचा भावार्थ शोधू शकता. यामुळे तुम्हाला खुप सगळ्या गोष्टी शिकायला मिळेल.

तर मित्रांनो आजची आपली पोस्ट आहे Marathi kavita On Life – Marathi poem – मराठी कविता ह्या कविता तुम्ही नक्की पूर्ण वाचा यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल.

तर चला सुरू करूया fyba marathi kavita | Marathi kavita On Life – marathi Poem आणि माहिती करू या याबद्दल.

महिला स्पेशल कविता नीरजा – Mahila Special Kavita | Kavi Nirja – कवी नीरजा

जेव्हा मुंबई सारख्या शहरात महिला घर साभाळून नौकरी करत असतात तेव्हा या महिलांचं एक वेगळंच भाव विश्व निर्माण झालेले असते. त्या भावविश्वाच वर्णन आपल्याला या कवितेत मिळेल नीरजा यांनी या महिला स्पेशल कवितेत हे वर्णन केले आहे.

भरगच्च हिंदकळणारा बायकांचा डब्बा

श्वासात मिसळतांना अनेक श्वास

ऐकू येतात एकमेकींच्या काळजाची स्पंदन

त्या समजू शकतात एखादीच हिंस्त्र होणं

चढताना धक्का लागला तर 

किंवा दुसरीच निमूट बसणं युगानुयुगे

स्फोटक परिस्थितीतही

तयार करतात इथं त्यांचं छोटस कुटुंब

पुरुषांशीवायच….

 

वाटून घेतात तिखट क्षण ही

खिदळतात

उधळतात

दाव सुटलेल्या गाईसारख्या

गात राहतात बेसूर

पण स्वताला हव्या त्या तालासुरात

त्या शोधत राहतात स्वताला

उभारताना आपलं एकटीच जग

जे माहित नसत त्यांच्या पुरुश्यांना….

 

ह्या जगातही भयाकुल

करत राहतात पायरण पोथ्याची,

गुणवंत राहतात स्वताला

उलट सुलट टाक्यांमध्ये विणकामाच्या.

प्रचंड बोलत राहतात बायका

स्वताचाही आवाज ऐकू येऊ नये इतक्या मोठ्याने

तर काही एकट्याच

पेलत भकास आयुष्य

पाहत राहतात मिटीमिटी

हसणाऱ्या बायकांकडे आश्चर्यचकित.

काही झोपतात

जन्मभराच जागरण झाल्यासारख्या

आपलं स्टेशन येईपर्यंत.

मराठी कविता निसर्ग – निसर्ग जाणवेची कविता – Marathi Nisarg Kavita

या नभाने या नभाला कविता (ना. धो. महानोर)

आपलं निसर्गाशी नात असाव कवी चे प्राण हे निसर्गात गुंतलेलं आहे हे या कवितेत दिसते तर बघूया निसर्ग कविता – Nisarg Kavita चला सुरू करू या.

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

आणि या मातीतून चैतन्य गावे

कोणती पुण्य अशी येति फळाला

जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

 

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

आणि माझ्या पापणीला पूर यावे

पाहता ऋतुगंध कांती सांडलेली

पाखरांनी मी खेळ मांडून गावे

 

गुंतलेले प्राण या रानात माझे

फाटकी ही झोपडी काळीज माझे

मी असा आनंदून बेहोश होता

शब्धगंधे तू मला असे बाहुत घ्यावे

 

तर मित्रांनो तुम्हाला ह्या [मराठी कविता – Marathi KavitaMarathi Poem] fyba marathi kavita नक्कीच आवडल्या असेल ही मला खात्री आहे.

तुम्हाला ह्या कवितांचा सारांश लागत असेल तर नक्की कंमेंट मध्ये suggestion द्या आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देऊ, जर तुम्हाला ह्या कविता आवडल्या असेल तर तुम्ही ह्या Marathi Kavita तुमच्या मित्र, मैत्रीनीला share करू शकता, आणि कंमेंट सुद्धा करा.

तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या लेखात तुम्हाला अशाच मराठी कविता मराठी लेटेस्ट माहिती वाचायची असेल तर नक्की फोल्लो करा आपली मराठी वेबसाईट Marathijosh आणि मिळवा नवीन माहिती सर्वात आधी.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *