आजचे राशिभविष्य मराठी : Todays Horoscope In Marathi – (December 2021)

राशिभविष्य: डिसेंबर २०२१ (Todays Horoscope In Marathi – December 2021

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?  आजचे तारे काय म्हणतात?  दैनिक राशिभविष्य 2021 द्वारे आजची राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घ्या.

Todays Horoscope In Marathi - December 2021
Todays Horoscope In Marathi – December 2021

मेष (Aries) :  या काळात कोर्टाचा निकाल लागला तर विरुध्द लागेल. उत्तरार्धात प्रशिक्षणासाठी निवड होईल. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान होईल. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. प्रलोभने टाळा. वाहन जपून चालवा. कुटुंबात अशांतता जाणवेल. चंद्रबल – 14, 15, 16, 20, 21

वृषभ (Taurus) : भावनिक वादाला कोर्टात घेऊन जाऊ नका. उत्तरार्धात वरिष्ठांची गैरमर्जी राहील. आपल्या कामाची गुणवत्ता वाढवणे गरजेचे राहील, भाग्यकरक अनुभव येतील पण कायदेशीर अडचणी येतील. अचानक धनलाभ संभवतो. चंद्रबल – 13, 17, 18, 22, 23

मिथुन (Gemini) : पात्रता कमी असताना संधी मिळेल. इतरांना तुच्छ लेखू नका. उत्तरार्धात इतर तुमच्या कामाने प्रभावित होतील. अहंपणा राहील. हौसमौज कराल. कामासाठी प्रवास होईल. विवाह जुळेल. सत्पुरुषांचे दर्शन होईल. विवाह जुळेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. चंद्रबल-१३,१४,१५,१६,१९,२०, २१

कर्क (Cancer) : शैक्षणिक नुकसान, पोटाचा विकार अनुभवाल. पतप्रतिष्ठा कमी होईल. आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणावर होईल. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. बुध्दिकौशल्याने लाभ होईल. रिकाम्या उठाठेवी करू नका. मित्राकडून फसवणूक होणे शक्य आहे. चंद्रबल- १४, १५, १६, १७, १८, २४

सिंह (Leo): गृहसौख्य बिघडेल. आई-वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. उत्तरार्धात आत्मविश्वास चांगला राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. मुत्सद्दीपणाने कामे कराल. विवाह जुळेल. चंद्रबल- १७, १८, १९, २०, २१

कन्या (Virgo) : कामे यशस्वी होतील. हौसमौज कराल. उत्तरार्धात रमाल. शैक्षणिक व कलाक्षेत्रात मोठे यश मिळेल. हाताखालील व्यक्तींवर पूर्ण विसंबू नका. शेतीपासून लाभ होईल. परदेशगमनाची संधी लाभेल. कर्णविकार जाणवेल. चंद्रबल – १३, १९, २०, २१, २२, २३

 

तूळ (Libra) : नेत्रविकार जाणवेल. उत्तरार्धात परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील रहाल. कुटुंबात मनमानी कराल. जोखीम पत्करू नका. संभाषणात वादाचे विषय टाळा. जमाखर्चाचा मेळ बसणार नाही. शारीरिक तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. सावधानता बाळगा. नवीन वस्त्रे मिळतील. चंद्रबल-१३,१४,१५,१६,२२,२३,२४

वृश्चिक (Scorpious) : मानसिक त्रास अनुभवाल. पित्ताचा त्रास संभवतो. उत्तरार्धात आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. महत्त्वाकांक्षी बनाल, निर्णायक कामात यश मिळेल. स्वतःला सिध्द कराल. क्रोध आवरा. भावनिक वादळ नियंत्रणात ठेवा. चंद्रबल- १४, १५, १६, १७, १८, २४

धनु (Sagittarius) : फौजदारी केसमध्ये अडकू नका. उत्तरार्धात नवीन कल्पना सुचतील. क्रोध आवरा. वाद टाळा. बोलताना जिभेला लगाम घाला. मोठे आर्थिक लाभ होतील. आग्रही रहाल. प्रॉपर्टीत गुंतवणूक कराल. कल्पनाशक्ती चांगली राहील. चंद्रबल – १७, १८, १९, २०, २१

मकर (Capricornus) : थोर व्यक्तीचे सान्निध्य लाभेल. कौतुक होईल. उत्तरार्धात मोठे खर्च निघतील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. विद्याव्यासंगी बनाल. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. संतती होईल. महत्त्वाकांक्षी रहाल. विलंब, अडथळे, त्रास अनुभवाल. चंद्रबल – १३, २०, २१, २२, २३

कुंभ  (Aquarius) : महिना सर्वोत्तम राहील. खरेदी-विक्री वाढेल. आर्थिक प्राप्ती वाढेल. प्रयत्नवादी, आशावादी रहाल. सर्व प्रकारचे लाभ होतील. परदेशगमनाची संधी लाभेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. खर्चीक बनाल. धंद्यात अस्थिरता जाणवेल. चंद्रबल-१४,१५,१६,२२,२३

मिन (Pisces) : प्रवास घडेल. भाग्यकारक अनुभवही येईल. उत्तरार्धात खरेदी-विक्री वाढेल. स्वभाव खर्चीक बनेल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. कायमस्वरूपी नोकरी राहील. परदेशगमनाची संधी लाभेल. बक्षिसे मिळवाल. कौतुक होईल. चंद्रबल १३, १७, १८, २४ 

Leave a Comment