झोप अत्यावश्यकच

शरीर झोपेच्या स्वाधीन होऊन पूर्ण विश्राम पावते तेव्हाच मेंदूला पाहिजे तो विसावा मिळतो.

पुरेशा झोपेवाचून जीवन अशक्य आहे

झोपल्यावर शरीरातील इंद्रियांचे, अवयवांचे कार्य कमीत कमी चालू राहते आणि त्यातून त्यांना विश्रांती मिळून त्यांची झीज भरून येते.

जेव्हा शरीर झोपेच्या स्वाधीन होऊन पूर्ण विश्राम पावते तेव्हाच मेंदूला पाहिजे तो विसावा मिळतो.

हृदयाचा वेग कमी होतो, रक्तदाब कमी होतो.

झोपेमध्ये न्यूरॉन्सच्या नवनिर्मितीसाठी आवश्यक अशा प्रथिनांचे उत्पादन केले जाते.

झोपेबद्दल आत्तापर्यंत इतके संशोधन झाले आहे, की त्याबद्दल खूप काही सांगता येईल

पूर्ण झोप मिळेल अशा तऱ्हेने तुमचे कामाचे ‘रुटीन’ बसवा.

पुरेशा झोपेमुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि काम करायला तरतरी येईल.