Please Bookmark this URL Mp4moviez Marathi, and Visit the Site Directly for All New Movies!

jijabai speech in marathi – जिजाबाई भाषण मराठी | राजमाता जिजाऊ माहिती

jijabai speech in marathi – Jijamata information in marathi, Jijamata speech in marathi, जिजामाता जयंती, जिजामाता निबंध, जिजामाता भाषण, जिजामाता माहिती, राजमाता जिजाबाईं विषयी माहिती, राजमाता जिजाऊ भाषण मराठी Rajmata Jijau Speech in Marathi. rajmata jijau speech in marathi. 

jijabai speech in marathi
jijabai speech in marathi

jijabai speech in marathi – जिजाबाई भाषण मराठी

असं म्हणतात कि इतिहासाच्या पानांमध्ये हरखून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी, परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी न कि केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जानिव करून देतात, येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्यत्वाने उजाळून टाकतात.

आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं या बाबतीत नशीबवानच ! कारण तसा वारसाच आम्हाला लाभला आहे, इतिहासातील प्रत्येल पण म्हणजे हिऱ्या – मानकांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पानं !

या मातीत थोर संत झाले , विचारवंत हि झाले ! इथेच वीर जन्माला आले, आणि इथेच आम्हाला हजारो वर्षांच्या निद्रेतून जागे केले ते समाजसुधारकांनी !

आज या इतिहासाची उजळणी करावी वाटली कारण आज १२ जानेवारी !

याच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या माउलींची जयंती ! हरवलेल्या स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुनरजन्म देणारी माता !

आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करून या मातीला आपला पहिला छत्रपती राजा देणारी माता म्हणजेच राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांची जयंती.

अगदी कालपरवाच अखंड क्रांतीज्योती सावित्रीबाईंची हि जयंती पार पडली, कुठे कुठे या जयंत्या मोठ्या प्रमाणावर साजऱ्या हि होत असतील.

आजच्या या दिनी आम्हाला एक प्रश्न पडलाय कि ज्या इतिहासाचे दाखले देऊन आम्ही नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी आमच्या या प्रेरणामुर्तींसोबत न्याय केलाय का?

जिजाऊ शिवाय शिवबा छत्रपती झाला असता ?ज्योतीराव कुणाच्या खांद्याला खांदा लाऊन स्त्री शिक्षणासाठी झगडले असते ? या थोर स्त्रीयान्शिवाय इतिहास हा इतिहास तरी झाला असता का ? शेवटी इतिहासाला जन्म द्यायला हि एक माउली च लागते हे हि आम्ही विसरलो ?

ज्या समाजात हजारो वर्षे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, दुर्गा – शक्ती अशी उपमा तर देतात पण सर्वात जास्त अत्याचारहि तिच्यावरच होत असतात, मग अश्या समाजाला जिजाऊ – सावित्रीबाई सारख्या असामान्य महिलांची ओळख करून देण्यात हा इतिहास का कमी पडला ?

आज हि स्त्री हि दुय्यमच, मग ती दलिताची असो वा सवर्णा ची ! हिंदूंची असो व मुस्लिमांची ! तीच गुलामगिरी तोच अन्याय ! अगदी आमच्या घरा -घरापर्यत हि असमानता ! आज हि गर्भातच तिची हत्या !

मग हे धड धडीत सत्य समोर असतांना का इतिहासकार का कमी पडले ह्या असामान्य स्त्रियांचे संस्कार रुजवण्यात ! बर ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या पाठीशी समाज तरी उभा राहिला का ?

आजचा दिवस म्हणजे एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माउली चा जन्म दिवस !

इतिहास निर्माण करणे म्हणजे झालेल्या चुकांना सुधारून पुन्हा नवा इतिहास घडवणे … मग आजच्या या दिवशी करूया एक संकल्प….

स्त्रियांचे हिरावलेले हक्काचे स्थान त्यांना प्राप्त करून देण्याचा ! आमच्या माता – भगिनी आणि मुला-मुलींमध्ये जिजाऊ आणि सावित्री चे संस्कार रुजवण्याचा ! येणाऱ्या पिढीला जिजाऊ – सावित्री सारख्या स्त्रियांची खरी ओळख करून देण्याचा !

इतिहासातील हरवलेले हे सोनेरी पान समाजासमोर उघडे करण्याची आज खरी गरज आहे, खात्री आहे येणारा काळ त्यांच्या विचारांनी – संस्कारांनी उजाळून जाईल !

याची सुरुवात आपल्या घरापासून करा ! तुमच्या मुलीमध्ये जिजाऊ आणि सावित्री बघायला सुरुवात करा ! फ़क़्त तिलाच नवनिर्माणाचे सामर्थ्य आहे, त्यांच्या हातूनच या राष्ट्राचे नव – निर्माण घडू दे !!

पुन्हा एकदा राजमाता – राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन !

जय जिजाऊ – जय शिवराय

राजमाता जिजाऊ 

आज १२ जानेवारी सर्व मराठ्यांनी आपल्या मनात कोरून ठेवावा असा दिवस…महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटनी देणाऱ्या, सुराज्याची स्वप्न साकारणाऱ्या, स्वाभिमानी, जाधवांची कन्या तर भोसलेंची सून असलेल्या राजमाता जीजाऊंची जयंती..ज्यांनी सर्व मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान भिनवला प्रत्येक  मावळ्यात शिवबा घडवला..ज्यांनी आपले उभे आयुष्य या स्वराज्याचा जडण घडनासाठी पणाला लावले.. वेळोवेळी पत्नी म्हणून धीराने शहाजी राज्यांच्या सोबत उभ्या राहिल्या..शिवरायांच्या मातृत्व बरोबरच गुरुत्वही स्वीकारले अशा कर्तुत्ववान “राजमाता जीजाऊ” मासाहेबांची जयंती…..

पित्याच्या शिलेदारीमुळे जन्मापासूनच दैवी आलेल्या असहाय भ्रमंतीचे चटके बसलेल्या, लग्नझाल्यावरही परत तीच दु:खद भ्रमंती वाट्याला आल्याने आणि ही भ्रमंती म्हणजे केवळ विषवृक्षाला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे ही जाणीव झालेल्या जीजाऊंना अनंत तीबलेनी ‘अग्निरेखा’ म्हणून संबोधले आहे..

 ‘अग्निरेखा’ जणू डीवचलेली नागीण,रौद्ररुप धारण केलेली आकाशाची चपला…जी क्षणातच सार ब्रम्हांड उजळून टाकते अशी अग्निरेखाच…!!! ती केवळ निमिषमात्रच चमकते पण सार ब्रम्हांड हादरवून टाकणारा आवाज करते, कसं घडलं याचा मागमूस ही न ठेवता जशी येते तशी निघूनही जाते…

राजमाता जिजाऊ ही अशाच पिता नी पती यांच्या सहवासात दरवेशाच निराधार जीवन जगल्या…पित्याची अमानुष हत्या पाहिली, पतीची अवहेलना उरत जतन करून ठेवली… पती हयात असताना परीत्यक्तेच जीवन वाट्याला येऊनही धीर सोडला नाही… आपण स्त्री आहोत, दुबळ्या आहोत असा विचारही स्पर्शु न दिलेल्या स्वभिमानी कन्या, कर्तुत्ववान पत्नी, देव-धर्म देशावर प्राणांहून अधिक प्रेम करणारी माता, बलवंत असूनही यावनी चाकरी करत पातशहाच्यासमोर गर्दन झुकावनाऱ्यांनची कीव न करणाऱ्या हिंदू स्त्री…

वीर संभाजी राजे आणि पिता, बंधू दत्ताजीच्या अकाली मृत्यूने दगलबाज यवनांना पुरत्या ओळखून चुकलेल्या मानी स्त्री…पातशाहीच्या काळात कर्तबगार वजीर म्हणून मिरवणाऱ्या, स्वैराचारी यवनांच्या  दुर्बलाने पेटलेल्या असतानाही धाडसाने मान वर करून पाहणाऱ्या.. आपल्या पुत्रात या स्वैराचारी यवनांच्या दगलबाजी विरुद्ध भावना ठेचून भरणाऱ्या आणि त्याला शस्त्र, अस्त्रविद्या, राजकारण समजावून सांगून बलवंत बनविणाऱ्या एक जिद्दी माता…..

‘अग्निरेखा’ मा जिजाऊ एक माता होत्या एका युगपुरूषाची पण केवळ माताच नाही तर कुणाची तरी  कन्या, पत्नीही होत्या..सर्व सामान्य स्त्रीला जी नातेसंबंध,बंधन असतात तशी सारी नाती त्यांनाही होती,  त्यांनी ती पत्कारली ही…पिता, बंधू, ज्येष्ठ चिरंजीव संभाजीच्या हत्येने विव्हळ बनल्या, पतीच्या अपमानाने चीडल्याही..पण हे सार असतानाही त्यांनी आपले कर्तव्य सोडले नाही जिद्द सोडलं नाही…

“माता ही खऱ्या अर्थाने एक शिल्पकार असते..तिने दिलेले बोध,ज्ञान हा कुठल्याही ग्रंथापेक्षा जास्त पवित्र,प्रभावशाली असते…आपल्या अपत्यांना घडविण्याच कर्तव्य तिला पार पडावच लागतं”…..

जीजाऊ साहेबांनी ही तसचं केल…जन्माला घालतानाच शिवरायांना आपलं सुन्दर रूप दिल..अगदी तसच त्याचं चरित्रही घडवलं….शस्त्रविद्या,अस्त्रविद्या,राजकारण आणि यावनांबदलचा द्वेश अगदी ठासून भरला..देव,धर्म, देशावर प्रेम करायला शिकवलं… जीजाऊंसाहेबांनी आपल्या सुसंस्काराने एक पातशाह बनविला जो सिंहासनावर बसण्याआधीच “राजे” म्हणून मान्यता पावला…असा बादशाह-“छत्रपती शिवराय”…

 शेवटी कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी अवतरले आणि आपल्या “छत्रपती शिवराय” मिळाले ते या माऊलीमुळेच..त्यांच्या आशीर्वादानेच…..

शिवरायांच्या हातून त्यांनी एक नवा इतिहास घडविला…..नवा सुराज्य स्थापित केलं…..

हिंदू हिंदू म्हणून जगाला तो या अग्निरेखेच्या प्रकाशामुळेच….. अशा या “अग्निरेखा” राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या ह्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम…!!!

जय जिजाऊ !!

जय शिवराय !!

तुम्हाला आजचा हा लेख jijabai speech in marathi – जिजाबाई भाषण मराठी, Rajmata Jijau Speech In Marathi नक्कीच आवडला असेल हा लेख आवडला असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि अशाच मराठी भाषण संबंधित माहिती साठी मराठीजोश ला भेट द्या.

Tags

No tags found for this post.

About Akshay P
Akshay P passionate movie review and info writer with a keen eye for storytelling, cinematography, and industry trends. With a deep love for films across all genres, [Your Name] delivers insightful reviews, in-depth analyses, and the latest updates from the world of cinema. Whether breaking down a blockbuster or uncovering a hidden gem, [Your Name] brings a unique perspective that resonates with movie lovers. Read More
For Feedback - [email protected]

Related Movies

29th August, 2025

Together Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

27th August, 2025

I Know What You Did Last Summer Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

27th August, 2025

The Map That Leads to You Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

26th August, 2025

Fall for Me Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

24th August, 2025

Eenie Meanie Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

23rd August, 2025

Gold Rush Gang Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

🍿 LATEST Movies